श्रीपूर – सध्या सोशल मिडीयावर रील तयार करुन अपलोड करण्याचा फंडा आला आहे . यातून मनोरंजन ते विविध विषयाची माहिती मिळते . श्रीपूर परिसरात असाच नाद करती काय फक्त आपला आबा ही धुम सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे .
श्रीपूर येथिल कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारख्यालयात वायरमन म्हणून काम करीत असलेले मारुती किसन सुरवसे यांनी अतिशय कल्पकतेने रील बनवून मनोरंजना बरोबर सेवाभाव वृत्ती जपली आहे .
वायमन म्हणून काम करत असताना अनेकांकडे विद्युत उपकरणांचा घोटाळा होतो . त्यावेळी या परिसरात मारुती सुरवसे यांना फोन करण्याचाच अवकाश स्वारी सर्व साधनांनिशी दारात हजर राहतात.
झालेला घोटाळा चालू करणे , एखादे नवे उपकरण बसवून देण्याचे काम झाल्यावर कुटूंबा सोबत रील तयार करून कुटूंबाचे महत्व या बरोबरच सामाजीक जाणीवांचा संदेश देण्याचे काम ते करतात जसे की , आई – वडिलांची सेवा करा त्यांचे गरजांकडे लक्ष द्या , शिक्षकां प्रति कृतज्ञता , मुक्या प्राण्यांवर दया करा , मुलांचे शिक्षण , आनंदी घर ठेवा , हे विषय रील च्या माध्यमातून अतिशय प्रभावी पणे मांडतात त्यामुळे मारुती सुरवसे यांची रील सध्या श्रीपूर परिसरात लहांना पासून आबाल वृद्धां पर्यंत नाद करती काय फक्त आपला आबा ही रील सोशल मिडियावर धूम ठोकत आहे .




















