सोलापूर – भाजपमध्ये अंतर्गत वादाने ठिणगी पेटली असून हा वाद आता थेट मुंबईपर्यंत पोहोचला आहे. सोलापूर शहरातील भाजप कार्यालयासमोर आंदोलन आणि घोषणाबाजी झाल्यानंतर आज दक्षिण मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी यांनी थेट मुंबई गाठली. भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासमोर नाराजी व्यक्त करीत दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील होणाऱ्या माजी आमदार दिलीप माने यांच्या प्रवेशाबाबत विरोध दर्शवला आहे . स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तिकीट वाटपाच्या वेळी निष्ठावान कार्यकर्त्यावर अन्याय होऊ नये, अशी भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
….
या कार्यकर्त्यांनी घेतली प्रदेशाध्यक्षांची भेट
…
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या शिष्टमंडळाची भेट घेऊन कार्यकर्त्यांच्या भावनांची दखल घेत अन्याय होऊ दिला जाणार नाही, अशी भूमिका स्पष्ट केली.या शिष्टमंडळात हनुमंत कुलकर्णी, विशाल गायकवाड, शिवराज सरतापे, संगाप्पा केरके, महेश देवकर, अर्जुन जाधव, अतुल गायकवाड, प्रशांत कडते, यतीन शहा आणि सचिन पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
…,
कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही
…
भाजप पक्षविस्तारासाठी अनेक माजी आमदारांचा पक्षप्रवेश सुरु आहे. मात्र यावेळी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करूनच निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नसल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितल्याचे पदाधिकार्यांनी सांगितले.
….
भाजपामध्ये गटबाजी
…
माजी आमदार दिलीप माने यांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश देण्याचा पालकमंत्री व आमदारांचा प्रयत्न सुरू आहे. मात्र यामुळे निवडणूकीत कार्यकर्त्यांवर अन्याय होणार असल्याने आंदोलन करण्यात आले. त्यामुळे माजी आमदार माने यांच्या प्रवेशाला एका गटाचा विरोध आहे, तर दुसर्या गटाकडून प्रवेशाची तयारी सुरू असल्याचे सांगण्यात येते.
…
राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...




















