कुर्डूवाडी – सोलापूर जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मच्या-यांना डिसेंबर 2007 पुर्वी संगणक परिक्षा न पास झाल्याने शासकीय आदेशाने झालेल्या वसुलीची देय रक्कम एक कोटी सत्तेचाळीस लाख अडूसष्ठ हजार दोनशे सत्तर रूपये जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना मुख्यकार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांनी पत्राद्वारे 260 प्रा.शिक्षकांना वसुली परत करण्याचे आदेश दीले असल्याची माहीती जिल्हा सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर संघटणेचे अध्यक्ष राजाराम चव्हाण यांनी माहीती दीली. कुर्डूवाडी पं.स.कार्यालयात आले असता त्यांंनी सांगीतले.
@ महाराष्ट शासनाने 5 मे 2007 रोजीच्या शासन निर्णयानुसार 31/12/2007 पुर्वी राज्यातील सर्व शासकीय कर्मचा-यांनी संगणक परिक्षा पास होणे बंधनकारक केले होते मात्र या परिक्षेत सोलापूर जिल्ह्यातील अनेक शिक्षक अपात्र झाले.अपात्र झालेल्या सर्व कर्मचा-यांच्याकडून 27/11/2020 च्या शासन निर्णयानुसार पेन्शनविक्री व उपदाना मधून मिळणा-या रकमेतुन वसुली करण्यात आली.या वसुलीची रक्कम 50 हजार ते 3 लाखापर्यत होती.
शासनाच्या या निर्णयाला जिल्हा सेवा निवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांच्या संघटनणेकडून जिल्हाध्यक्ष राजाराम चव्हाण यांनी व त्यांच्या सहकार्यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हाण दीले.या अपिलाचा निकाल उच्च न्यायालयाकडून 24 फेब्रू.2025 रोजी सेवानिवृत्त शिक्षकांच्या बाजूने लागुन मा. मुख्याधिकारी सोलापूर यांना सर्व शिक्षकांना वसुली परत करण्याचे आदेश दीले असल्याचे चव्हाण यांनी सांगीतले.त्यानसार सोलापूर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी 24 नोहें.
2025 रोजी जिल्ह्यातील सर्व पं.स.च्या गटविकास अधिकारी यांना पत्रक काडून सर्व शिक्षकांची वसुल केलेली रक्कम परत करणेबाबतचे आदेश दीले आहेत. या संपुर्ण प्रक्रीयेमध्ये रामचंद्र पाटील,दत्तात्र्यय पवार, लिंबराज जाधव, श्रीमंत गुंड,आशोक भांजे व सर्व तालुक्याचे अध्य़क्षांनी प्रयत्न केले. मुख्यकार्यकारी जंगम यांच्या आदेशामुळे निवृत्त शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

















