जेऊर – सर्व क्षेत्रातील महिलांच्या प्रगतीमागे स्त्री शिक्षणासाठी अवघे आयुष्य वेचलेल्या सावित्रीमाईंचे योगदान महत्त्वाचे असून याचा विसर समाजाने पडू देता कामा नये असे प्रतिपादन महाराष्ट्रातील प्रसिद्ध समाजप्रबोधनकार ज्येष्ठ किर्तनकार ज्ञानेश्वर (माऊली) वाबळे महाराज यांनी शेटफळ ता- करमाळा येथे सावित्रीमाई फुले व जिजाऊ जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित समाजप्रबोधन किर्तननाच्या कार्यक्रमात बोलताना केले.येथील शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
यावेळी त्यांनी जिजाऊ सावित्रीसारख्या लढवया स्त्रीयांचा आदर्श आजकालच्या महिलांनी घेण्याची गरज असुन. या जिजाऊ व सावित्रींनी आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रचंड कष्ट सोसले आहेत. यांची जाणीव आपल्याला असली पाहिजे. महाराष्ट्रात वारकरी संप्रदाने स्त्रीयांना आदराचे स्थान देत प्रतिष्ठा देऊन समतेचा पाया तेराव्या शतकात पंढरीच्या वाळवंटात घातला होता .हाच वारसा पुढे घेऊन जात सर्वांनी तो जाणिवपूर्वक जपण्याची गरज असल्याचे मत वाबळे महाराजांनी यावेळी आयोजित किर्तनाच्या कार्यक्रमात व्यक्त केले.
तसेच या कार्यक्रमाला नितीन खटके ,प्रा संजय चौधरी ,संजय गुटाळ ,सचिन काळे , भारत पांडव ,बाळासाहेब झोळ ,नितीन तकीक ,अतुल निर्मळ ,गणेश हुंबे ,पिंटू जाधव,सोपान गरड,अजित उपाध्ये ,हेमंत शिंदे आदिनाथ माने ,चौधरी महाराज, जगताप महाराज, वैभव हुंबे, शाळा व्यवस्थापन समिती , शिक्षक वर्ग ,भजनी मंडळ ,समस्थ ग्रामस्थ शेटफळ इत्यादी उपस्थित होते.


























