सोलापूर – साखर पेठ येथील बाहुसार शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विद्यानिकेतन प्रशालेत माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. रविवार दिनांक १४ डिसेंबर रोजी १९८५-८६ च्या बॅचचे विद्यार्थी पुन्हा शाळेत एकत्र येणार आहेत.
याप्रसंगी आजतागायत ७५ विद्यार्थ्यांनी मेळाव्यासाठी नोंदणी केली आहे. गेल्या महिनाभरापासून विद्यार्थ्यांची मेळाव्याची पूर्वतयारी सुरू आहे. सर्व माजी शिक्षक व कर्मचारी यांना मेळाव्याचे निमंत्रण देण्यात आलेले आहे. अनेक विद्यार्थी इतरत्र स्थायिक झालेल्या मित्र-मैत्रिणींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहेत.
४० वर्षांनी सर्वजण एकत्रित येत असल्याने सर्वांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. १९८५-८६ च्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.

















