सोलापूर – कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट सोलापूर शाखेत शनिवार दि. 14/02/2026 रोजी टेक्निकल प्रदर्शनाचे आयोजन केले होते; त्यासाठी निमंत्रित बी. एस. कुलकर्णी प्रशालेचे मुख्याध्यापिका सौ. ऐश्वर्या कुलकर्णी मॅडम यांच्या शुभहस्ते सरस्वती प्रतिमेचे पूजन करून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी मुलांना समजेल अशा शब्दात खूप सुंदर मार्गदर्शन केले.
केटीआयच्या सर्व ट्रेडच्या विद्यार्थ्यांनी एकूण 16 प्रोजेक्टस सादर केले. यामध्ये इलेक्ट्रिकल, एसी आणि रेफ्रिजरेशन, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स काॅम्प्युटर हार्डवेअर आणि नेटवर्किंग, काॅम्प्युटर सॉफ्टवेअर, मोबाईल रिपेअरिंग या ट्रेडनी विविध प्रोजेक्ट मांडले होते. यासाठी अनेक शाळामधून विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांनी भेट दिली व आपले या प्रदर्शनाचे अनुभव व उपयोग यासह शुभेच्छा दिल्या. तसेच इंडस्ट्रियल एरियातून अनेक मान्यवर यांनी या प्रात्यक्षिकांना भेट देऊन विद्यार्थ्यांमध्ये नवीन कल्पना व त्या प्रत्यक्षात आणण्याची खूप मोठी क्षमता आहे असे नमूद केले.
यातूनच इंडस्ट्रीजसाठी कुशल, कार्यक्षम अशा व्यक्ती असल्याचे नमूद केले. केटीआय मध्ये शिकून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता खूपच चांगली असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.
हा प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी केटीआयचे शाखा व्यवस्थापक श्री वल्लभ कुलकर्णी, शिक्षक वृंद श्री आनंद देशपांडे, श्री विजयकुमार श्रीमल, श्री प्रकाश जगताप, श्री सचिन साळुंखे, सौ राजश्री सलगर, एसआरओ सुप्रिया मोरे आणि विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.























