जेऊर – झरे ता.करमाळा येथील जयप्रकाश बिले पब्लिक स्कूलच्या वतीने स्टुडंट्स लीड कॉन्फरेन्स अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयप्रकाश बिले, खजिनदार आशा बिले, संचालिका डॉ. स्वाती बिले, डॉ. सुनीता दोशी, डॉ.निशा सारंकर, ज्योती मुथा, मुख्याध्यापिका अमृता परदेशी, सर्व शिक्षक स्टाफ व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची मोडेल्स सादर केले. यामध्ये विज्ञान युगातील विविध साधनांचा समावेश होतो. मिशन सिंदूर,वॉटर इलेक्ट्रिसिटी,रोबोट, आत्मनिर्भर भारत, कंप्युटर, डीएनए मॉडेल, हर्बेरियम अशा सर्व विषयांचे विविध मॉडेल प्रोजेक्ट तयार करून मुलांनी त्याबद्दल माहिती दिली. यातून मुलांचा आत्मविश्वास ओसंडून दिसत होता.संस्थेचे अध्यक्ष जयप्रकाश बिले सर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व अनमोल असे मार्गदर्शन केले. दोशी व सौ. मुथा यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे मनभरून कौतुक केले.
विद्यार्थ्यांच्या हस्ते मान्यवारांचा सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. सत्रसंचालन स्कूलचे विद्यार्थी आकांक्षा कदम व वेदांत कादगे या विद्यार्थ्यांनी केले.मान्यवरांचे आभार प्रदर्शन वेदांत कादगे या विद्यार्थ्याने केले.



















