शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
भोकरदन : शिवसेना शहर प्रमुख महेश भैय्या पुरोहित यांच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये महात्मा फुले स्मारकाच्या नियोजित जागेत ,रामेश्वर मंदिर,, नवीन बाजार पट्टी , या ठिकाणी वृक्षारोपण ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना बिस्किट पुडे व केळीचे वाटप करण्यात आले,
इब्राहिमपूर येथील गुरु गणेश मिश्री गोशाळा येथे गाईंना चाऱ्याचे वाटप करण्यात आले, रामेश्वर मंदिर येथे उद्धवजी ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी अभिषेक व आरती करण्यात आली शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी शेतकरी बांधवांना केसर आंब्यांच्या रोपांचे वाटप करण्यात आले शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात येऊन दहा हजार सदस्य नोंदणीचा संकल्प करण्यात आला.
सोबतच दक्षिणमुखी मारुती मंदिर येथे रामरक्षा पठण, हनुमान चालीसा, महाआरती चे आयोजन करण्यात आले होते.. यासह इतर सामाजिक उपक्रमांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
यावेळी शिवसेना शहर प्रमुख महेश पुरोहित, उपशहर प्रमुख विठ्ठल पवार, ज्ञानेश्वर सहाने,संतोष सुरडकर, युवा सेना शहराध्यक्ष प्रदीप पैठणकर, ईश्वर इंगळे, कृष्ण तराळ, रवी सुरसे, बालू जाधव, राजू शेळके,जनार्धन गारखेडे, योगेश पुंड, सागर थारेवाल, स्वप्निल शर्मा, अमोल नेवासकर , जनार्धन गारखेडे, राजू तळेकर, राजू इंगळे, रामेश्वर तळेकर, पिराजी जाधव, योगेश जंजाळ, गुलाब शेख, नारायण चक्के,