सोलापूर : मजेरवाडी येथील शमा उर्दू स्कूल येथे फुड फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. यात गुलाब जामुन, दही वडा, कस्टर्ड, भोपळ्याची खीर, पाणीपुरी, खिचडा, ताहरी, बटाटा समोसा, आपे , नुडल्स , सँडविच , वडापाव ,इत्यादींचे बावीस स्टॉल लावण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी कुलहिंद उर्दू कॉन्फरन्सचे खजीनदार शफी कॅप्टन तर प्रमुख पाहुणे म्हणून सोशल महाविद्यालयाचे उर्दू विभागप्रमुख डॉ. म. शफी चोबदार, रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटीचे डायरेक्टर म. इक्बाल बागबान, संस्थेचे अध्यक्ष अय्युब अहमद नल्लामंदू आदी उपस्थित होते.
प्रारंभी मुख्याध्यापक अबुबकर नल्लामंदू यांनी प्रास्ताविक करून शाळेचा वार्षिक अहवाल सादर केला. त्यानंतर सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. चोबदार म्हणाले की, आजच्या काळात चविष्ट पदार्थ खाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे हा “फुड फेस्टिव्हल” विद्यार्थ्यांना एक नवीन आयाम देतो.
अध्यक्षीय भाषणात शफी कॅप्टन म्हणाले, “फूड फेस्टिव्हल हा केवळ वार्षिक उत्सव नाही, तर त्यामुळे विद्यार्थ्यांच्या स्थितीत लक्षणीय सुधारणा होते. या कार्यक्रमातून त्यांना प्रेरणा मिळते आणि त्यांना व्यावसायिक आणि व्यावहारिक ज्ञान मिळते.”
हे फुड फेस्टिव्हल मुख्याध्यापक अबुबकर नल्लमंदू यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला तर याला यशस्वी करण्यासाठी शाहीन सदाफ, यास्मिन बिजापुरे, दिलशाद नलामंदू, जुबैदा सय्यद खान, मेराज अल्लोळी, आसिया नलामंदू, कौसर शेख, रेश्मा अरब यांनी परिश्रम घेतले. . शाहीन सदाफ यांनी सूत्रसंचान केले तर आभार यास्मिन बिजापुरे यांनी मानले.


















