अकलूज – श्री साईबाबा सेवा ट्रस्ट संग्रामनगर यांच्यावतीने श्री साई प्राणप्रतिष्ठा २९ वा वर्धापन दिनानिमित्त श्रीराम नवमी उत्सवाचे आयोजन केले असल्याची माहिती ट्रस्टच्या वतीने देण्यात आली.
संग्रामनगर येथील श्री साईबाबा मंदिरात गुरुवार दिनांक २६ रोजी रामनवमी निमित्ताने मंदिरात सकाळी ६ वाजता अभिषेक व महापूजा डॉ. धवलसिंह मोहिते पाटील व सौ. उर्वशीराजे मोहिते पाटील यांच्या हस्ते होणार असून यावेळी श्रीमती पद्मजादेवी मोहिते पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
सकाळी ८ वाजता विनय उंट यांच्या हस्ते यज्ञ प्रज्वलन करण्यात येऊन सकाळी १० वाजता शिवशंभो भजनी मंडळाचे सामुदायिक भजन होणार आहे. दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मोत्सव व महाआरती सहकार महर्षी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील व सौ. सुलक्षणादेवी मोहिते पाटील यांच्या हस्ते संपन्न होत असून यावेळी आ. रणजितसिंह मोहिते पाटील व मान्यवर हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
दुपारी १२-३० ते २-३० पर्यंत महाप्रसाद वाटप होणार असून यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ७ वाजताची आरती खासदार धैर्यशील मोहिते पाटील व सौ. शितलदेवी मोहिते पाटील यांच्या हस्ते होत आहे. सायंकाळी मंदिर परिसरात ब्रह्मचैतन्य महिला भजनी मंडळ माळीनगर व ओंकार महिला भजनी मंडळ शंकरनगर यांच्यावतीने भजनाचा कार्यक्रम होणार आहे.

























