१०२६ विद्यार्थ्यांतुन जुबेर शेखने प्रतिकूल परस्थितीवर मात करत प्रथम क्रमांक पटकावून मिळवले घवघवीत यश
चांदसाहेब शेख मंगरूळ ता. तुळजापूर 9850532634
मंगरूळ : ( चांदसाहेब शेख ) नव्यानेच सुरू झालेल्या अबॅकस या शैक्षणिक उपक्रमात १०२६ राज्यस्तरीय विद्यार्थ्यांतुन प्रतिकूल परिस्थितीतवर मात करत जगणाऱ्या अशिक्षित परिवारातील तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील इयत्ता तिसरी वर्गातील जुबेर शेखने प्रथम क्रमांक पटकावुन घवघवीत यश संपादन केले आहे
श्री प्रोऍक्टिव्ह अबॅकस मंगरूळ ६ मिनिटात १०० गणिते सोडवण्याच्या स्पर्धेत जुबेर शेख या विद्यार्थ्यांने ४मिनिटात १००शंभर गणिते सोडवून नवीन उपक्रम केला
राज्यस्तरीय शिकवणी घेणारी अग्रगण्य अबॅकस शिक्षण संस्थेने राज्यस्तरीय स्पर्धा मंगळवार २५ जून रोजी सोलापूर येथे घेतली त्याचा निकाल त्याच दिवशी जाहीर करण्यात आला त्यामध्ये राज्यातील गुणवंत 1026 विद्यार्थ्यांतुन प्रथम क्रमांक पटकावला श्री प्रोअँक्टिवह अबॅकस चे ५४ विद्यार्थी बक्षीस पात्र झाले त्याला अबॅकस मंगरूळ ता. तुळजापूरचे चालक प्रा. आशिष साठे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले त्याच्या या यशाबद्दल राज्यातील अनेक शिक्षण संस्थेचे संचालक मंडळ , उस्मानाबाद जिल्ह्यातील हजरत खाजा शमशोद्दीन गाजी रहे. वेल्फेयर सोसायटीचे अध्यक्ष मा.नगरसेवक नादेर उल्लाह हुसैनि सर , जिल्हा परिषदेचे माजी सभापती मुकुंद डोंगरे , मिरर इंडिया न्युजचॅनेलचे संपादक शफीभाई मणियार यांच्यासह विविध शाळांचे शालेय समिती अध्यक्ष , पत्रकार , शिक्षणप्रेमी सुजाण नागरिक व मंगरूळ ग्रामस्थांतुन अभिनंदन व कौतुक केले जात आहे