कन्नड – मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात अवघ्या चार वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या बलात्कार व निर्घृण हत्येच्या अमानवी घटनेचा कन्नड शहर व तालुक्यात तीव्र निषेध व्यक्त होत आहे. आरोपी संजय खैरनार (वय २४) याने केलेल्या क्रूर कृत्याविरोधात फाशीची शिक्षा व जलद न्यायाची मागणी जोर धरत आहे
या पार्श्वभूमीवर कन्नड तालुका सुवर्णकार समाजाच्या वतीने बुधवार (दि.19) रोजी तहसील कार्यालय तसेच कन्नड शहर पोलिस ठाण्यात निवेदन सादर करण्यात आले. शासनाला समाजाच्या भावना कळवण्यात आल्या असून, दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
या निवेदनावर संजीव सोनार (अध्यक्ष), युवराज विसपुते, श्याम महाले, विनोद बागुल, गणेश विसपुते, अर्जुन जडे, शांताराम बिरारी, गोपाल वडनेरे, राहुल टाक, सागर महादाने, पवन पावटेकर, अनिल खराडकर, पंकज निकुंभ, धीरज अंबिलवादे, सतीश बुटे, भुषण पोद्दार, सोमनाथ जाधव, योगेश बाविस्कर, ज्ञानेश्वर बनसोड, रोहित दाभाडे, रमेश जाधव, गणेश सोनार, अशोक टाक, विशाल कुमावत, संजय वर्मा, संदीप सेठी, उमाकांत खरोटे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत यावेळी सुवर्णकार समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.




















