बार्शी – डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे अंतर्गत विभागीय क्रीडा स्पर्धा २०२५ चे आयोजन दि. २९ नोव्हेंबर रोजी एस. एस. वी. पी. एस. बी. एस. देवोरे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग धुळे येथे करण्यात आले होते. सदर स्पर्धेत ॲथलेटिक्स क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 100 मीटर 200 मीटर 400 मीटर 1000 मीटर 1500 मीटर व 5000 मीटर धावणे या स्पर्धा समाविष्ट करण्यात आल्या.
यामध्ये सोजर कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयातील तृतीय वर्षाचा विद्यार्थी पवन विलास सुरवसे यांनी 1500 मीटर धावणे व 5000 मीटर धावणे या स्पर्धेत भाग घेऊन या दोन्ही स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला व तो विद्यापीठ स्तरीय स्पर्धेसाठी पात्र झाला आहे.
सोजर महाविद्यालय हे नेहमीच विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना व कौशल्यांना प्राधान्य देण्याचे काम करते. शारीरिक तंदुरुस्ती टिकवून ठेवण्यासाठी आणि जीवनशैली आरोग्यपूर्ण बनवण्यासाठी ऍथलेटिक्सचा मोठा वाटा आहे. ऍथलेटिक्समुळे केवळ शरीर निरोगी राहत नाही, तर मानसिक ताणतणावही कमी होतो.
नियमित व्यायाम आणि ऍथलेटिक्समुळे वजन नियंत्रणात राहते, हृदयाची कार्यक्षमता सुधारते आणि ऊर्जा पातळी वाढते. क्रीडाशिक्षक म्हणून प्रा. रणजीत शेळके यांनी काम पाहिले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजित करपे यांनी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले.
सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री. अरुणदादा बारबोले व सचिवा सौ कल्पनाताई बारबोले यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.


























