सोलापूर – पी.एस. इंग्लिश इंग्लिश मिडीयम टेक्निकल हायस्कुलने आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनात वाईल्डलाइफ कॉन्झर्वेशन असोसिएशन, सोलापूर टीमतर्फे सोलापुरात आढळणाऱ्या विविध प्रजातींच्या पक्ष्यांचे पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली व तदनंतर कार्यक्रमास उपस्थित पाहुण्यांचा परिचय करून देण्यात आला व प्रमुख पाहुण्यांचा पुष्प व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संगीता कोळी मुख्याध्यापिका एसपीएम इंग्लिश मीडियम स्कूल सोलापूर उपस्थित होत्या. त्यांच्याच हस्ते फीत कापून विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुण्या कोळी यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध वैज्ञानिक उपक्रमांची माहिती घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन केले.
WCAS अध्यक्ष अजित चौहान यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना सोलापुरातील पक्षी वैभव व पक्षी संवर्धन याबद्दल थोडक्यात मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना पोस्टरमधील विविध प्रजातीच्या पक्ष्यांची ओळख करून दिली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती कांबळे, पर्यवेक्षक जयेश शिरढोणे, प्रा. पर्यवेक्षिका कल्पना रामावत, पूर्व प्राथमिक समन्व्यक अर्चना अक्कलकोटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष धाकपाडे, सूरज धाकपाडे, सिद्धांत चौहान यांनी परिश्रम घेतले.

















