सोलापूर : येथील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन, पद्मशाली सखी संघम व पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने’ आठ महिलांना ‘पद्म – बिझनेस वुमन अवॉर्ड’ तर, दोन महिलांना ‘पद्म – जलपरी पुरस्कार’ रविवार, दि. २२ मार्च रोजी सायंकाळी ४.३० वाजता पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयाच्या विणकर सभागृहात होणार आहे. अशी माहिती फाउंडेशनचे उपाध्यक्ष नागेश सरगम, सखी संघमच्या अध्यक्षा कल्याणी पेनगोंडा यांनी दिली.
पुरस्कार सोहळा कार्यक्रम आ. देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमचे अध्यक्ष डॉ. सूर्यप्रकाश कोठे, आदी प्रमुख उपस्थितीत वितरण कार्यक्रम होणार आहे.
उद्योजक श्रीधर सुरा यांच्यातर्फे स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल व नॅपकीन बुके प्रदान करण्यात येईल. ही निवड फाउंडेशनचे संस्थापक गौरीशंकर कोंडा यांनी केली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सोहळा कार्यक्रम होणार आहे. या पुरस्कार सोहळ्यास पद्मशाली समाजातील बंधू व भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थिती रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.





















