सोलापूर – वर्धा जिल्ह्यातील आर्वी पंचायत समितीत मनरेगा योजनेत झालेल्या कथित अपहार प्रकरणात गटविकास अधिकारी सुनीता मरसकोल्हे यांच्यावर गुन्ह्यात सहभागी असल्याचा ठपका ठेवत अटक करण्यात आली . या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र विकास सेवा संघटनेच्या बॅनर खाली ४ डिसेंबर पासून सामुदायिक रजा आंदोलनात सहभागीय अधिकारी मंगळवारी आपल्या कर्तव्यावर हजर झाल्याने मंगळवारपासून सोलापूर जिल्हा परिषद मुख्यालयसह पंचायत समितीचा कामकाज सुरळीत सुरू झाला आहे.
या रजा आंदोलनात जिल्हा परिषदेतील सर्व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह गटविकास अधिकारी, सहाय्यक गट विकास अधिकारी सहभागी झाल्याने ४ डिसेंबर पासून जिल्हा परिषद व पंचायत समितीचा कारभार ठप्प झाला होता.
महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेने सामूहिक रजा आंदोलन स्थगित केले असले तरी मनरेगा संदर्भात मागण्यानुसार शासन निर्णय निर्गमित होईपर्यंत मनरेगा बाबतचे कामकाज बंद ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती या संदर्भात बोलताना दक्षिणचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी दिली.
























