मंगळवेढा – सह्याद्री पर्वत रांगेतील पराक्रमाची साक्ष देणारा किल्ला पन्हाळा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे शेती व शेतीविषयक आदर्श धोरण तरुणांना कळावे याकरिता शेतकरी राजाच्या सन्मानार्थ मंगळवेढा येथील वारी परिवार सायकल क्लबच्या वतीने मंगळवेढा-कोल्हापूर-पन्हाळगड २१० किलोमीटर सायकल मोहीमेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती क्लबचे अध्यक्ष स्वप्निल टेकाळे यांनी दिली बाजीप्रभू देशपांडे व शिवा काशिद यांच्या स्मारकावरती नतमस्तक होण्यासाठी दिनांक २४ ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत सदर सायकल मोहीम होणार आहे सदर मोहिमेत शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे रक्षण केले आता काळानुसार शेतकऱ्याचे संरक्षण करणे गरजेचे आहे तसेच बाजीप्रभू देशपांडे व शिवा काशिद ज्या पद्धतीने स्वराज्यासाठी लढले त्याच पद्धतीने आता शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी लढण्याची गरज आहे.

या आशयाची पत्रके वाटून प्रबोधन करण्यात येणार आहे बाजीप्रभू देशपांडे आणि शिवा काशीद यांच्या त्यागातून आणि बलिदानातून पावन झालेला किल्ला पन्हाळा आजही इतिहासाची साक्ष देत उभा आहे त्यामुळे या ऐतिहासिक अभिमानाच्या वारशाचे भावी पिढीसाठी जतन व्हावे आजही या परिसरात इतिहासाची साक्ष देत असलेला तीन दरवाजा,कोठारे,तलाव,बुरुज,मंदिरे ही ऐतिहासिक स्थळे नेमकी काय आहेत हे तरुणांना कळावे तसेच पर्यावरण संवर्धन व जनजागृती,गड संवर्धन,निसर्गाचे रक्षण व आरोग्य संवर्धन,इंधन बचत असे अनेक हेतूने वारी परिवार सायकल क्लबच्या वतीने प्रत्येक वर्षी सायकल मोहीम काढली जाते याआगोदरही सायकल क्लबच्या वतीने मंगळवेढा-बानूरगड
मंगळवेढा-रायगड,मंगळवेढा-तुळापूर-वढु बुद्रुक अशा अनेक सायकल मोहिमा झालेल्या आहेत तरी शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी आयोजित केलेल्या सायकल मोहिमेचे साक्षीदार होण्यासाठी ९०२८८८६०५५ / ९४०३४५१२९७ / ७२७६८६०८४२ या क्रमांकावरती संपर्क करुन दिनांक १८ ऑक्टोबर २०२५ पर्यंत नाव नोंदणी करावी असे आवाहन वारी परिवार सायकल क्लबच्या वतीने करण्यात आले आहे यावेळी अर्जुन पाईप मंगळवेढा प्रो प्रा दत्तात्रय भुसे यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे.