सातारा, 24 जून (हिं.स.) : सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील कण्हेर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सध्या तुरळक पाऊस पडत आहे.
मात्र, या धरणाच्या पाणीसाठ्यात हलकीशीच वाढ झाली असून अद्यापही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होणे जरुरीचे आहे. कास पठाराकडे जाणाऱ्या यवतेश्वर डोंगरावरून कण्हेर धरणाचे विहंगम दृश्य दिसत आहे.