विशाल पवार
देगलूर/प्रतिनिधी
देगलूर शहरातील नामवंत व्यापारी यांचे वाहन चालक नरबागे हे सकाळी सुमारे दहा ते दहा वाजून पंधरा गणेश कृषी सेवा केंद्र चे मालक गणेश व्यंकटराव अचिंतलवार यांचे वाहन चालक नरबागे कमलाकर पांडुरंग हे नेहमीप्रमाणेच एचडीएफसी बँकेत 26 लाख 5 हजार रुपये भरण्यासाठी ती रक्कम कार मध्ये घेऊन निघाले होते, जात असताना पाण्याच्या टाकीजवळ दोन अज्ञात व्यक्ती ने दोन चाकी वाहनावर येऊन अचानक घरच्या समोर आडवे येऊन दरवाजा उघडून जबरदस्तीने पैशाची बॅग घेऊन पळून गेले अशी माहिती मिळाताच देगलूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे हे त्या ठिकाणी पोहचले. सदरील प्रकरणाची सखोल चौकशी केली वाहन चालकास विचारपूस केले असता वाहन चालकाने दुचाकी स्वार असलेल्या दोन युवकाचे वर्णन सांगितले त्याच वेळी पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे यांनी नजीकच्या सीसीटीव्ही फुटेज पाहिले व सायबर सेलच्या मदतीने त्यांनी पुढील कारवाई चालू केली असता चालकाच्या जवाब नुसार आढळत असलेल्या व्यक्तीची चौकशी चालू केली असता नरसी -नायगाव ते दुचाकी स्वार रक्कमेसह आढळून आले.
नरसी नायगाव रोडवरील आढळून आलेल्या एम एच 26 सी जी 9010 या दुचाकी वर आरोपीस रकमेसह अटक करण्यात आले. आरोपी नामे सचिन चंद्रकांत बकरे वय 32 वर्ष राहणार देगलूर यास अटक करण्यात आले.तसेच आरोपी नंबर दोन चिंट्या हा फरार असून त्याला लवकरच अटक करू व वाहन चालकाची उलट तपासणी केली असता वाहन चालक हा आरोपी असू शकतो अशी संभावना पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे , सहाय्यक पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, पोलीस उपविभागीय अधिकारी संकेत गोसावी यांच्या मार्गदर्शनानुसार देगलूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे यांच्या आदेशाने डीपीचे पोलीस कर्मचारी सुधाकर मलदोडे, साहेबराव सगरोळीकर, पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा तलवारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल माधव मरगेवाड यांनी आरोपीस ताब्यात घेतले या पुढील तपास पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे हे करीत आहेत.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...