सोलापूर – ग्रँड फिनाले ऑफ द डायमंड जुबली अँड 19 नॅशनल जांबोरी,लखनऊ,उत्तर प्रदेश या ठिकाणी दि.23 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर 2025 या कालावधी घेण्यात आले.
या जांबोरीत आपल्या प्रशालेतील पाच स्काऊट,एक स्काऊट मास्टर,आठ गाईड,एक गाईड कॅप्टन असे एकूण 15 विद्यार्थी सहभागी झालेले होते.
यानिमित्त उ.सोलापूरचे गटशिक्षणाधिकारी बापूराव जमादार साहेब,जागृती विद्यामंदिरचे प्राचार्य विजयरत्न चव्हाण,शेळगी केंद्रप्रमुख चंद्रकांत वाघमारे,बीआरसीचे शेख साहेब, आयडॉल शिक्षक सारंग पाटील,प्रशालेचे मार्गदर्शक धरेप्पा हत्तुरे,प्र.मुख्याध्यापक रमेश दिंडोरे यांच्या शुभहस्ते सहभागी विद्यार्थी व स्काऊट-गाईडचे शिक्षक परमेश्वर चांदोडे,अनिता हौदे यांचा बुके व ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी ग.शी.बापूराव जमादार साहेब यांनी सहभागी विद्यार्थ्यांशी संवाद साधून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले.


























