सोलापूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये उत्तम कामे होत असून मोदीसाहेबांचे नेतृत्व चन्नवीर चिट्टे सारख्या देशभरातील कोट्यावधी प्रामाणिक आणि निष्ठावंतांच्या समर्पणातून उभी आहे म्हणून चन्नवीर चिट्टे सारख्या प्रामाणिक कार्यकर्त्यास पक्षांने आगामी मनपा निवडणुकीत संधी देऊन न्याय द्यावा असे आवाहन केले.
भाजपा सोबत इतर पक्षातील नेतृत्वालाही त्यांनी आवाहन केलं की धर्मासाठी काम करणारया व जनतेच्या सेवेत सदैव तत्पर असणारया कार्यकर्त्यांना वेळीच संधी देवून त्यांच्या कार्याची योग्य ती दखल घ्यावी अन्यथा पक्ष वा संघटनेत अविश्वासाचं वातावरण निर्माण होईल जे पक्षासाठी घाकत ठरेल. भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, जनसेवक चन्नवीर चिट्टे यांच्या प्रभाग क्र. ०३ मधील भवानी पेठ स्थित जनसंपर्क कार्यालय उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की चन्नवीर चिट्टे हे जवळपास गेल्या ३०- ३५ वर्षापासून भारतीय जनता पार्टी बरोबर जोडले गेलेले कार्यकर्ते आहेत. राजकिय कार्यक्रमासोबतच नेहमी ते समाजकार्यात अग्रेसर असतात. स्वखर्चातून समाजपयोगी असे विविध कार्यक्रम सातत्यपूर्ण रितीने ते राबवत असतात. सर्वसामान्य गरजू लोकांना मदत करणे हा त्यांचा स्थायीभाव आहे. अशा समर्पित विचाराने काम करणाऱ्या कार्यकर्त्याला योग्य वेळेला, योग्य संधी पक्ष नेतृत्वाने दिली पाहिजे तरच सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे मनोधैर्य उंचावेल अशी अपेक्षा व्यक्त करताना चन्नवीर चिट्टे यांच्या कार्याचा त्यांनी समर्पक शब्दात गौरव केला. याप्रसंगी बोलताना माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी म्हणाले की चन्नवीर चिट्टे यांचे कार्य मी खूप जवळून बघत आलो आहे. ते नेहमीच जनसेवेसाठी तत्पर असतात. त्यांच्यामधली विनयशीलता ही विशेष उल्लेखनीय आहे.
यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत त्यांना संधी देण्यासाठी जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी निश्चितपणाने आशीर्वाद देतील असा आशावाद व्यक्त केला. मागील काळात जरी चिट्टेंनां योग्य ती संधी मिळाली नसली तरी देखील यंदाच्या निवडणुकीत त्यांना पक्ष नेतृत्व नक्की संधी देऊन ‘भगवान के घर में देर है लेकिन अंधेर नही’ ही उक्ती सार्थ करतील असा विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमा प्रसंगी काशीपीठ जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांच्या शुभहस्ते संपर्क कार्यालयाचे यथोचित उद्घाटन संपन्न झाले. याप्रसंगी भवानी पेठ भागातील प्रसिद्ध अध्यात्मिक गुरू श्री अण्णाराव बिराजदार महाराज उपस्थित होते.
या कार्यक्रम प्रसंगी प्राध्यापक अशोक निंबर्गी , माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांनी आपल्या मनोगतातून चन्नवीर चिट्टे यांच्या राजकिय व सामाजिक कार्याचा गौरव करून आगामी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. प्रा. अशोक निंबर्गी म्हणाले की या व्यासपीठावर कसा असा प्रश्न काहिंना पडला असेल परंतु जेव्हा एखाद्या व्यासपिठावर जगदगुरू आणि शिवाचार्यांची उपस्थिती असते त्यावेळी ते धर्मपीठ बनते आणि मी आत्ता धर्मपिठावर आहे. मी माझ्या या जिवलग मित्रासाठी कुठल्याही व्यासपिठावर जावू शकतो. चन्नवीर चिट्टे म्हणजे आम्हा सर्व मित्रांसाठी संकटलमयी बाहेर पडण्याचा एक हमखास व सुरक्षित मार्ग आहे. एका वाक्यात त्यांना वर्णाव म्हणजे ‘ एक कॅाल , प्रॅाब्लेम सॅाल’ असं हे व्यक्तिमत्व.
गुरूशांत धुत्तरगावंकर म्हणाले की आम्ही जेव्हा राजकारणात नव्हतो तेव्हापासून चिट्टे साहेबांचं राजकारण व समाजकारण बघतोय. अनेकांना मोठं करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा असूनही त्यांना मात्र त्यांच्या वाट्याच, हक्काचही मिळालं नाही परंतु काही मिळवण्यासाठी ते राजकारण किंवा समाजकारण करत नाहीत तर ध्येयवादी व्यक्तिमत्व असून त्यांना त्यांच्या हक्काच तरी मिळालायच हवं.
यावेळी व्यासपीठावर भवानी पेठ भागातील जेष्ठ नेते श्री सुरेश पाटील, प्रकाश हत्ती, दिलीप पतंगे, ज्ञानेश्वर मॅकल, संजय होमकर, अक्षय अंजीखाने, सागर अतनुरे, भाजपा महिला आघाडी अध्यक्ष सौ रंजीता चाकोते, शहर भाजपाच्या सरचिटणीस सुधाताई अळ्ळीमोरे, अमर बिराजदार, बिज्जू प्रधाने, आदी उपस्थित होते. चन्नवीर चिट्टेंनां शुभेच्छा देण्यासाठी राजकिय , सामाजिक क्षेत्रासह विविध पक्षातील मान्यवर नेते मंडळी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कल्याण करजगी, श्रीनिवास दासरी,पप्पू क्षीरसागर , रवी शहापुरकर ,सद्दाम कोसगीकर,महेश हलसगी, नितीन हलसगी ,साईनाथ सज्जे , सोमनाथ कलशेट्टी, रवी कोळी , रेवणसिद्ध बिराजदार, अनिल कीरणगी, करण हलसगी, ओम जमादार, अंबादास पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथमेश कासार यांनी केले तर आभार प्रदर्शन सागर अतनुरे यांनी केले. याप्रसंगी त्या भागातील खुप मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
























