सोलापूर – जाई जुईनगर ईच्छा भगवंताची फार्महाऊस येथे पठाण शहावली बाबा दर्गा उरूस, दीपावली पाडवा आणि ईच्छा भगवंताची परिवाराचे मार्गदर्शक अनिल जाधव यांना नुकतीच प्राप्त झालेली वकिली पदवी या त्रिसंधी आनंदाच्या निमित्ताने भव्य स्नेहभोजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. हा सोहळा ईच्छा भगवंताची परिवाराचे संस्थापक अध्यक्ष आधारस्तंभ लक्ष्मण जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात पार पडला.
या स्नेहभोजनात सर्वपक्षीय नेते, आजी-माजी आमदार, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अनिल जाधव यांचा गौरव केला. या कार्यक्रमास सर्वपक्षीय राजकीय, सामाजिक नेत्यांची उपस्थित होती.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी अनिल जाधव यांना वकिली पदवी मिळाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मंगलकामना व्यक्त केल्या. त्यांच्या कार्यातून समाजात सामाजिक एकोपा, सौहार्द आणि विकासाची दिशा कायम राहील, असा विश्वासही मान्यवरांनी व्यक्त केला.
स्नेहभोजन सोहळ्याचे उत्तम नियोजन शिवाजी मामा गायकवाड, चंद्रकांत ब्रदर जाधव, आणि राजू दादा जाधव यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार किसन जाधव, नागेश गायकवाड, अनिल जाधव आणि चेतन नागेश गायकवाड यांनी केले.या कार्यक्रमाने समाजातील सर्व स्तरांना एकत्र आणत “सामाजिक सौहार्द आणि एकतेचा सुंदर संदेश” दिला असून, जाईजुई नगर परिसरात हा सोहळा चर्चेचा प्रमुख विषय ठरला आहे.


















