तभा फ्लॅश न्यूज/कंधार : संत सेवालाल महाराज बंजारा लमान तांडा समृद्धी योजना वर्षभरापूर्वी राज्य शासनाने महाराष्ट्रात अस्तित्वात आणली या योजनेच्या माध्यमातून राज्यातील बंजारा लमान तांड्यांना ग्रामपंचायत दर्जा देऊन विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न व्हावा म्हणून या उद्देशाने ही योजना अस्तित्वात आली परंतु वर्षभरापासून अनेक जिल्ह्यांमध्ये या योजनेचे प्रस्ताव प्रलंबित आहेत, जिल्हास्तरावर तालुकास्तरावर अशासकीय सदस्यांची नेमणूक करण्यात आली परंतु राज्य स्तरावर एकही बैठक न झाल्याने समाजात नाराजी होती.
धर्मगुरू आमदार महंत बाबूसिंगजी महाराज यांच्या प्रयत्नानंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सूचनेनुसार राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी तातडीची बैठक मंत्रालयातील त्यांच्या दालनामध्ये लावली राज्याचे ग्रामविकास सचिव राज्यस्तरीय समितीचे सदस्य यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली या बैठकीमध्ये सदस्याकडून ज्या सूचना मांडण्यात आल्या त्या सूचना मान्य करून ग्रामविकास मंत्री यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांना दूरध्वनीद्वारे सुचित केले निकषात बसत असणाऱ्या तांड्याचा तातडीने प्रस्ताव पाठवण्यासंदर्भात सूचना दिल्याने समाजामध्ये चांगला मेसेज गेला आहे, अशी माहिती या योजनेने अशासकीय सदस्य भगवान राठोड यांनी दिली. धर्मगुरू आमदार बाबू सिंगजी महाराज यांच्या पाठपुराव्याने तातडीची बैठक 6 ऑगस्ट रोजी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या दालनामध्ये आयोजित केली होती, नांदेड जिल्ह्यात 650 पेक्षा जास्त तांडे असून महसुली दर्जा नसल्याकारणाने अनेक प्रस्ताव तालुकास्तरावर अडलेले आहेत.
नांदेड जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्याचा प्रवास करून अशासकीय सदस्य भगवान राठोड, प्रकाश राठोड, संध्याताई राठोड,कैलास खसावत यांनी यापूर्वी प्रयत्न केले आहेत. राज्यस्तरावरून यासंदर्भात सूचना आल्याने समाजामध्ये चांगला मेसेज गेला आहे, यावेळी ग्रामविकास मंत्री महोदयांनी राज्यातील विविध,महसूल विभागात लोकसंख्येच्या निकषावर पात्र असलेल्या बंजारा लमाण तांड्यांना महसुली व ग्रामपंचायतचा दर्जा देण्याचा प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी संत सेवालाल बंजारा/ लमाण तांडा समृद्धी योजनाबाबत मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले. याबाबत अमरावती, छत्रपती संभाजी नगर, नाशिक विभागीय आयुक्तांना थेट दूरध्वनी द्वारे सूचना दिल्या.
यावेळी ग्रामविकास विभागाचे सहसचिव वी श.बोंदरे, बंजारा/ लमाण तांडा समृद्धी योजनेच्या राज्यस्तरीय समितीचे अशासकीय सदस्य महंत जितेंद्र महाराज, श्रावण चव्हाण भगवान राठोड, पंडित राठोड, डॉ मोहन चव्हाण, भक्तराज राठोड, डॉ जगदीश सकवान, निलेश जाधव, सदाशिव चव्हाण,रविकांत राठोड, देविदास राठोड, वसंत नाईक, तसेच समाज संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.