तभा फ्लॅश न्यूज/ देगलूर : दळणवळणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे असलेले देगलूर ते हणेगाव, देगलूर ते मुक्रमाबाद व बल्लूर फाटा ते मानूर या रस्त्याच्या मजबूती करणासाठी, त्याचबरोबर रस्त्यांच्या दुतर्फा झालेल्या काटेरी कुंपणाची तोडणी करून रस्ता मोकळा करून देण्याच्या प्रमुख मागण्यांसाठी करडखेड येथील छत्रपती संभाजी राजे चौकामध्ये आक्रोश रास्ता रोको आंदोलनाला परिसरातील शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभागी होत.
अडीच तासासाठी हा रस्ता संपूर्ण चक्काजाम करण्यात आला. या रास्ता रोको आंदोलनामध्ये विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व परिसरातील सरपंचांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून परखडपणे आपली भूमिका मांडून हा रस्ता रोको आंदोलन यशस्वी घडून आणला. देगलूरचे तहसीलदार भरत सूर्यवंशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता निळकंठवार व राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता पेद्देवाड हे प्रत्यक्ष आंदोलना स्थळी उपस्थित राहून आंदोलनकर्त्याना लिखित आश्वासन दिल्यानंतर हे रास्ता रोको आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले.
या रास्ता रोको आंदोलनामध्ये माजी नगराध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार, शिवसेनेचे महेश पाटील, संभाजी ब्रिगेडचे संकेत पाटील सोमूरकर, माजी सभापती विवेक पडकंठवार, अशोक देसाई देगावकर, रमेश सोनकांबळे शिवणीकर, माधव फुलारी, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष बालाजी इंगळे, शहराध्यक्ष संजय जोशी, रणजीत पाटील कुशावाडीकर, सचिन पाटील किनीकर, राहुल देसाई देगावकर, भास्कर पाटील केदारकुंठेकर, उत्तमराव वाडीकर, काँग्रेसचे भरत पाटील मोहसीन मरखेलकर, दत्ता हाळंबरे, माधव केरूरे, बालाजी पाटील, उमाकांत भूताळे, पांडू पाटील, सरपंच चंद्रकांत गजलवार, मिरज पाटील, माधव वाडेकर व मोठ्या संख्येने नागरिक व पत्रकार बांधव उपस्थित होते.
आंदोलन यशस्वी करण्यासाठी मानवी हक्क अभियानाचे मच्छिंद्र गवाले, काँग्रेस पक्षाचे जिल्हा प्रवक्ते कैलास येसगे कावळगावकर, संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष जेजेराव शिंदे, माजी जि प सदस्य नागनाथ वाडेकर, शहाजीराव बाबरे, निशिकांत कांबळे, दशरथ सूर्यवंशी, संतोष चिद्रावार, करडखेडचे युवा नेतृत्व श्रीनिवास मंदिलवार, अहमद खुरेशी, सुरेश सावकार शिंदे, किशन पांचाळ, बाबूराव चिनगुलवार, दिपक मोघे, शेख वजीर साब, मारोती कांबळे, बालाजी ईबितवार, अशोक कोकणे, दिगंबर कोकणे, ईश्वर मुंडकर, यादव गाडे, नागनाथ चांदावाड, आशोक आबाजी, रामा दारगलवर, विलास कोकणे, जयदीप गाडे, महेबुब बागवान, आहेमद चौधरी, संभाजी चिंतले यांनी विशेष परिश्रम घेतले.