सोलापूर – क्रीडा व युवा सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत शालेय कराटे या क्रीडाप्रकारात सोलापूर शहर व पुणे विभाग स्तरावर रुद्र अॅकॅडमी, शिवस्मारक व ट्रेडिशनल अँड स्पोर्ट्स कराटे असोसिएशनचे सर्व अॅथलिटस आपापल्या वजनीगटात विजेते ठरले.
स्पोर्टस कराटे बॅचची आर्या यादव ही संगमेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता बारावीमधील विद्यार्थिनी एकोणीस वर्षाखालील मुली बावन्न किलो खालील वजनगटात तर सतरा वर्षाखालील मुले सत्तर किलो खालील वजनगटात ऋतुराज साठे हा बी.एफ. दमाणी प्रशालेचा इयत्ता दहावीतील विद्यार्थी राज्य स्तरीय स्पर्धेसाठी विभागाचे प्रतिनिधित्व करतील.
सर्व यशस्वी कराटेपटूंना आंतरराष्ट्रीय कराटे अॅथलिट आशीयाई पदक विजेती भुवनेश्वरीच्या मार्गदर्शनाने अ स्तरीय राष्ट्रीय पंच व कोच मिहिर सुरेश जाधव तसेच रुद्रच्या सात रस्ता शाखा व दमाणी प्रशालेचे प्रशिक्षक आकाश झळकेनवरु यांनी प्रशिक्षण दिले असून संचालिका रेन्शी संगीता सुरेश जाधव यांचे निर्देश लाभले आहेत.
शहर स्तरावर यशस्वी कराटे अॅथलिट:
अंश सोलसकर (यशोधरा कनिष्ठ महाविद्यालय), तेजस तुरेराव(गांधीनाथा हायस्कूल ), तन्मय बहिरवाडे (सिद्धेश्वर इं.मे. स्कूल), कौशल तापडिया(महेश इं मे स्कूल), सिद्धराज कुलकर्णी (संगमेश्वर पब्लिक स्कूल), श्रेयस कवीटकर (माॅडर्न स्कूल), अक्षिता कुलकर्णी (माॅडेल पब्लिक स्कूल), लहर सज्जन, सानवी वाळवेकर (दोघे आय एम एस), शिवम डोईजोडे, क्षितिज जाधव, यशदीप देशपांडे, प्राची ताकभाते, ऋतुजा मोरे, स्वरा ताकभाते (सर्व दमाणी प्रशाला).




















