वेरूळ / संभाजी नगर – प पू 108 नियम सागर महाराज संघ यांचा पिंछी परिवर्तन कार्यक्रम 12 नोव्हेंबर रोजी छत्रपती सभाजीनगर श्री पार्श्वनाथ ब्रम्हचारी आश्रम जैन गुरुकुल मध्ये परमपूज्य 108 विद्यासागर महाराज यांचे परम शिष्य निर्यापक मुनिश्री नियम सागर महाराज, अभिनंदन सागर, महाराज, ऋषभ सागर महाराज व सुपार्श्वसागर महाराज यांचा गत चार महिन्यांपासून सुरू आहे.
चातुर्मास पर्वाचा अंतिम समापनाच्या निमित्ताने दिनांक 12 नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता पिंछी परिवर्तन कार्यक्रमाचे भव्य स्वरूपात आयोजन करण्यात आले आहे. यावेळी महाराजांच्या पिंछी प्राप्त करण्याचा मान संयम धारी श्रावकाला प्राप्त होणार आहे.
या निमित्ताने प पू 108 नियम सागर महाराज अभिनंदन सागर महाराज वृषभ सागर महाराज व सुपार्श्वसागर महाराज यांच्या मंगलमय प्रवचनाचा लाभ प्राप्त होणार आहे, तरी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन चातुर्मास कमिटीचे अध्यक्ष दिनेश गंगवाल संयोजक नवीन पाटणी, महामंत्री डॉ प्रेमचंद पाटणी, सुमित ठोले, मदनलाल पांडे, निर्मल कुमार ठोले, महेंद्र दगडफोडे ,गौतमचंद ठोले गुलाब चद बोराळकर रानुजैन यांनी केले आहे.
या कार्यक्रमासाठी चे संपूर्ण नियोजन बाल ब्रह्मचारी पंडित मनीष भैया यांच्या मार्गदर्शनात होणार आहे. यावेळी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले आहे.अशी माहिती अतुल बादे पियूशकासलीवाल नरेंद्र अजमेरा यानी दिली



















