वेळापूर – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिसेवाडी येथे शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठण करण्यात आली आहे.
शासन परिपत्रकानुसार प्रत्येक वर्गातून निवड घेण्यात आली यामध्ये नवनाथ पिसे, प्रियंका साठे, तुकाराम पिसे, महादेव पिसे, ज्योती पिसे, हरिदास वाघ, उमा पिसे, अण्णासाहेब शेंडे, अमोल राऊत, रुचिरा पिसे, सुनिता पिसे, रामचंद्र पिसे, शितल गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य पुष्पा पिसे, दादासाहेब पिसे, सारिका शिंदे, यांची निवड करण्यात आली. शाळा व्यवस्थापन समिती समितीच्या अध्यक्षपदी अण्णासाहेब शेंडे तर उपाध्यक्षपदी अमोल राऊत यांची पुनश्च फेर निवड करण्यात आली.
गावचे उपसरपंच भाऊसाहेब पिसे, तसेच इतर पालक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते. सदर निवडीचे कामकाज मुख्याध्यापक जालिंदर बनकर सयाजी माने, कृष्णदेव तुपे, प्रशांत चिंचकर, प्रशांत पाटील, सारिका शिंदे, अवंती शिंदफळकर आदि शिक्षकांनी पार पाडले. निवडीनंतर सर्वांचे सन्मान उपसरपंच भाऊसाहेब पिसे व शिक्षक यांच्यातर्फे करण्यात आले.
अध्यक्षांनी शाळा व्यवस्थापन चे काम काय असते व गुणवत्ता वाढीसाठी तसेच स्पर्धा परीक्षा नियोजन पालक म्हणून आपली काय जबाबदारी याबद्दल सविस्तर मनोगत व्यक्त केले तर उपसरपंच यांनी आपल्या परिसरातील मुले आपल्या शाळेत पाठवून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी सर्व शिक्षकांनी प्रयत्न केले पाहिजेत असे सांगितले.शेवटी सर्वांचे आभार सयाजी माने यांनी मानले.
——————————————
नूतन अध्यक्ष अण्णासाहेब शेंडे उपाध्यक्ष अमोल राऊत उपसरपंच भाऊसाहेब पिसे व सर्व सदस्य.






















