वेळापूर – सोलापूर जिल्हा परिषद अंतर्गत तालुकास्तरीय खो-खोच्या क्रीडा स्पर्धा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिसेवाडी या ठिकाणी उत्साहात पार पडल्या. स्पर्धेचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी सुषमा महामुनी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब शेंडे ,उपाध्यक्ष अमोल राऊत, यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी बीटविस्ताराधिकारी सिद्धेश्वर भरते, केंद्रप्रमुख बापूसाहेब नाईकनवरे, विठ्ठलराव काळे, बाळासाहेब लावंड, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आबासाहेब पिसे, मुख्याध्यापक जालिंदर बनकर व सर्व बीट मधील शिक्षक तसेच ग्रामस्थ आदीं उपस्थितीत होते.
या स्पर्धेसाठी वेळापूर ,माळशिरस, दहिगाव पिलीव, नातेपुते, अकलूज या बीट मधील लहान व मोठा गट मुले मुली यामध्ये जवळपास ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. पंधरा वर्षापासून विजयाची परंपरा पिसेवाडी मधील खो-खो मुलांनी आपल्याकडे कायम ठेवली. यामध्ये नातेपुते बीट मधील पिसेवस्ती व पिसेवाडी यामध्ये झालेल्या अंतिम सामन्यात पिसेवाडी संघाने पाच गुणांनी विजय मिळविला.
यामध्ये पवन पिसे, आदित्य जानकर, तन्मय पिसे, सनी जाधव, महेश पिसे, ओम पिसे,प्रथमेश पिसे, सोहम पिसे स्वराज पिसे, रणवीर पवार, कार्तिक भानवसे, संभव राऊत आधी खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ दाखवून परिसर मंत्रमुग्ध केला. सर्व पालक व विद्यार्थी यांनी हलगीच्या नादसुरामध्ये आनंद उत्सव साजरा केला.
विजेत्या व उपविजेत्या संघांना पं स. माळशिरस कडून प्रमाणपत्र व ट्रॉफी तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब शेंडे यांच्याकडून महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा व ट्रॉफी देण्यात आली.पंच म्हणून अजित सर व एस के सर, लखन कांबळे, सुरज शेवाळे तसेच वेळ आधिकारी संजय देवकते, वीरेंद्र पत्की व गुणलेखक फडणीस जरक, विजय दोलतोडे यांनी काम पाहिले.
या स्पर्धा पार पाडण्यासाठी शाळेतील शिक्षक सयाजी माने, कृष्णदेव तुपे, प्रशांत चिंचकर, प्रशांत पाटील, सारिका शिंदे, अवंती सिंदफळकर आदींनी परिश्रम घेतले.

















