सोलापूर – मौजे बेंबळे ता. माढा जि. सोलापूर येथील अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या पैलवानास ताब्यात घेवून एक देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत राऊन्ड असा एकूण 50,200/- रु. किंमतीचा मुद्देमाल ग्रामीण पोलिसांनी जप्त केला.
पैलवान अभिषेक उर्फ भैय्या गायकवाड हा टेंभूर्णी शहरातील हॉटेल सागर, परमिट रुम येथे अवैध अग्निशस्त्रासह बसला असून त्याचे अंगावर क्रिम रंगाचा फुलशर्ट व निळया रंगाची जिन्स घातलेली असल्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार लागलीच पोलीस उपनिरीक्षक म.इसाक अबास मुजावर यांनी दोन पंचासह हॉटेल सागर परमिट रुम येथे जावून त्याला ताब्यात घेवून अंगझडती घेतली असता, कंबरेच्या उजव्याबाजूस मॅगझीनसह एक गावठी पिस्टल व मॅगझीनमध्ये एक जिवंत राउन्ड मिळून आले. त्याप्रमाणे टेंभूर्णी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा तपास उपनिरीक्षक मदने हे करीत आहे. आरोपीस अटक करुन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस दि. 20/03/2026 पर्यंत 02 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर यांचे मार्गदर्शनाखाली टेंभूर्णी पोलीस ठाणेचे प्रभारी सहा. पोलीस अधिक्षक आत्राम, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक म.इसाक अबास मुजावर, सफौ नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, अक्षय डोंगरे, संदीप हुलगे, चालक सतिष बुरुकुल यांचे पथकाने कामगिरी बजावली आहे.
























