माळशिरस – .माळशिरस तालुच्याचा पश्चिम भाग हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो .या भागातील जमीन हि मध्यम स्वरुपाची असल्याने व शेती क्षेत्र पूर्णता निसर्गावर अवलंबून असल्याने या भागात ज्वारी ,बाजरी ,मका ,कांदा पिके घेतली जातात .अनेक वर्षानंतर समाधानकारक पाऊस झाल्याने,व अद्याही नाले ओढे ओसंडून वाहत असल्याने यावर्षी अनेक वर्षानंतर या भागातील शेतकरी उसाची लागवड करीत असल्याचे दिसून येत आहे.
यावर्षी राज्यात सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झाला असून माळशिरस तालुक्यातही सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे.सर्वच नाले ,ओढे ओसंधून वाहत आहेत .दुष्काळी पत्तातील सर्वच पाझर तलाव ,बंधारे पूर्ण क्षमतेने भरले आहेत.पश्चिम भागातील शेती क्षेत्र पाउसावर अवलंबून आहे. या भागातील शेतकरी शेती बरोबर मेंढपाळाचा व्यवसाय करतात. या भागात ज्वारी ,बाजरी ,मका कांदा पिके घेतली जातात.गेले पाच सहा वर्षापूर्वी पाऊस होत होता परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे या भागातील शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत होता. पाण्याची श्वास्वती नसल्याने उसाची लागवड केली जात नव्हती. परंतु यावर्षी पाण्याची शास्वता झाल्यामुळे ,मका ,कांदा यांना हमी भाव मिळत नसल्याने चार वर्षानंतर प्रथमच शेतकरी वर्ग उसाची लागवड करीत असल्याचे दिसून येत आहे.
मका,कांदा आदींना हमीभाव नसल्याने पिक घेणे परवड नाही .यावर्षी पाऊस झाल्याने अद्यापही नाले ओढे वहार असल्याने बंधारे ,तलाव भरले असल्याने अन्रेक वर्षानंतर उसाची लागवड केली.आहे आमच्या भागातील जमिनी हलक्या असून त्यांना सातत्याने पाणी द्यावे लागते यावर्षी विहिरीनाही पाणी असल्याने पाण्याची शास्वता आहे.
समाधान चोरमले ,शेतकरी ,जळभावी (माळशिरस)


























