पर्यावरणाच्या संतुलनासाठी वृक्षारोपण अत्यंत गरजेचे – मा सभापती,प्रल्हादराव बोराडे.
—————————–
मंठा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पर्यावरण संवर्धनासाठी ज्याप्रमाणे ‘एक वारकरी एक झाड ‘हि संकल्पना पंढरपूरच्या वारीतील वारकऱ्यांना दिली त्या संकल्पणेलाच साद देत मंठा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रल्हादराव बोराडे यांनी आपल्या ५४ वर्ष वय पुर्ण झाल्यानिमित्त ५४ झाडे लावली. शहरातली वार्ड क्र.१५ मध्ये हा उपक्रम त्यांनी राबवला.
वातावरणातील बदलामुळे पर्यावरणावर दुष्परिणाम होत आहे.पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षलागवड करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पर्यावरणाची काळजी न घेतल्यास भविष्यात मानव जातीवर मोठे संकट येऊ शकते असे बोराडे यांनी यावेळी सांगितले.