सामाजिक विचार मंचच्यावतीने महावृक्षारोपण
वाळूज महानगर (प्रतिनिधी) : बजाजनगर परिसरात ठिकठिकाणी कचर्याचे ढिगारे लागत आहेत, याची दखल घेत सामाजिक विचार मंच व समस्त शिवभक्त परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने स्वतंत्रता दिनाचे औचित्य साधून आज 15 ऑगस्ट रोजी नाना नानी पार्क बजाजनगर येथील परिसरातील कचरा जमा करून व जागेची स्वच्छता करून ७८ व्या स्वतंत्र दिनानिमित्त ७८ वृक्षांचे रोपण करण्यात आले,
यावेळी सामाजिक विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष गजानन नांदुरकर, अध्यक्ष केशव ढोले साहेब, रवींद्र शेलगावकर, सरपंच सुनील काळे, कैलास भोकरे, सचिन गरड, विजय सरकटे, गणेश गायके व सामाजिक विचार मंचचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.