अमरावती 11 ऑगस्ट (हिं.स.)
अमरावती शहरापासून ८ किमी अंतरावर असलेल्या पोहरा व चिरोडीच्या जंगलातील शेतशिवारात काही शेतकऱ्यांना वाघ दिसल्याने त्यांनी तेथून पळ काढला. याबाबत माहिती मिळताच चांदुर रेल्वे वन विभागाने तातडीने घटनास्थळ गाठून वाघाच्या पंज्याचे ठसे घेतले. परंतु, सावधान बाबतच्या सुचनांचे मजबूत फलक न उभारता वनविभागाच्या संबंधित कर्मचाऱ्यांनी सतत पाऊस सुरू असताना देखील साधा एफोर पेपवर प्रिन्ट आऊट काढून लोखंडीफलकावर चिपकविण्याचा महाप्रताप केल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.
अमरावती शहरातील वडाळी, एसआरपीफ कॅम्प परिसरापासून सुमारे ८ किमी अंतरावर पोहरा व चिरोडी हे बरेच मोठे घनदाट जंगल आहे. पोहरा जंगलात जुने वाघामाय मंदिर आहे. त्या भागात कधीकाळी वाघांचा समुह राहत असल्याने त्या मंदिराला वाघामाय मंदिर असे नाव पडले. असे असले तरी गेल्या तीन, चार दशकांपासून पोहरा, चिरोडीच्या जंगलामध्ये वाघ दिसल्याची नोंद नाही. या दोन्ही घटनाट जंगलांमध्ये १२ ते १६ बिबट असल्याची नोंद वन विभागात आहे. यासाठीच पोहरा ते चिरोडी दरम्यानच्या जंगलामध्ये वन विभागाने मिनिसफारी सुरू केली होती. अशातच १० ऑगष्ट रोजी काही शेतकरी पोहरा वचिरोडी जंगलील शिवारातील आपआपल्या शेतात जात असताना त्यांना वाघाचे दर्शन झाल्याने त्यांनी तातडीने गावाकडे पळकाढला.
याबाबत चर्चेला उधान आल्याने चांदुर रेल्वे वनविभागा पर्यंत माहिती गेली. माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने तातडीने जंगलात शोध घेतला असता पथकाला बऱ्याच ठिकाणी वाघाच्या पंज्याचे ठसे आढळल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून ठशांचे नमूने गोळा केले. पोहरा, चिरोडी जंगलात वाघाचे आगमन झाल्याने लगतच्या सर्व गावांमध्ये, मुख्य रस्त्यावर, जंगलामध्ये ठिकठिकाणी लोकांना सावधान, या जंगलामध्ये वाघ, बिबटचा संचार आहे,
असे मजबूत फलत लावणे गजरेचे होते. परंतु, वनविभागाच्या काही अतिहुशार अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वाघाबाबत सावधानतेचा मजकूर एफोर साईजच्या पेपरवर प्रिन्टआऊट काढून मुख्य रस्त्यावर तसेच जंगलात व गावालगत असलेल्यावनविभागाच्यालोखंडी फलकावर चिपकविल्या. त्यामुळे त्या सुचनेकडे कुणाचे लक्ष जात नसल्याने पोहराव चिरोडीच्या जंगलात वाघाचा संचार सुरूझाला आहे, हे लोकांना तसेच आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांना कळत नाही. वाघाच्या संचारापासून अनभिज्ञ असलेले शेतकरी बिनधास्त शेतात जात असल्याने कोणतीही अप्रिय घटना होण्याची दाट शक्यता असल्याचे बोलले जात आहे.