नांदेड – नांदेड जिल्ह्यात सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राखणे व समाजातील गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी कठोर पावले उचलली आहेत वाळू तस्करी करणाऱ्या गुन्हेगारास एम पी डी ए अंतर्गत जिल्हा दंड अधिकारी राहुल कर्डिले यांच्या शिफारशीनुसार अवैद्य वाळू तस्करी करणारा स्वप्निल चौदंते यास नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांनी एक वर्षासाठी स्थानबद्ध करून हर्सुल कारागृहात जेरबंद केले.
नांदेड जिल्ह्यात वाळू तस्करी आळा बसावा यासाठी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार व जिल्हा दंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी दीर्घ काळापासून वाळू तस्करी करणाऱ्या लोकांवर
एमपीडीए अधिनियमाप्रमाणे गुन्हेगारास पकडून त्यांना स्थानबद्ध करण्याची मोहीम राबवली आहे. या मोहिमेनुसार नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी वाळू तस्कर स्वप्निल दिलीप चौदंते वय २३ वर्ष राहणार नई आबादी मुदखेड ता. मुदखेड याच्यावर
एमपीडीए अधिनियमाप्रमाणे कार्यवाही करून गुन्हा दाखल करण्यात आला असुन स्वप्नील चौदंते यास एक वर्षाची स्थानबद्धतेची कार्यवाही करून हर्सुल कारागृह छत्रपती संभाजीनगर येथे जेरबंद करण्यात आले. सदरील कार्यवाहीमुळे सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.


















