देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर दौऱ्यावर असून कुंभारीमध्ये साकारण्यात आलेल्या रे नगरच्या हस्तांतरण सोहळ्यास उपस्थित राहून चावी प्रदान करणार आहेत. त्याच अनुषंगाने तसेच सभास्थळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी केंद्रीय पथक तसेच पोलीस यंत्रणा दक्ष असून सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले दिसून आले रात्री दीड वाजता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन एका लॉजवर नजरकैदेत ठेवले तर सामाजिक कार्यकर्ते तथा डेमोक्रॅटिक पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सोहम लोंढे पृथ्वीराज मोरे दलित पॅंथरचे अतिश बनसोडे मिथुन लोखंडे आदींना देखील ताब्यात घेतल्याचे दिसून आले. सदरची कारवाई फौजदार चावडी पोलीस ठाणे आणि सलगर वस्ती पोलीस ठाणे पोलिसांनी केल्याचे सांगण्यात आले.
राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...




















