तभा फ्लॅश न्यूज/ माहूर : माहूर शहर बस स्थानकासमोर असलेल्या चहा टपरीवर काही इसम मटका घेत असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी स्वतः मटका अड्ड्यावर जात धाड टाकून मटका घेण्याचे साहित्यासह रोख रक्कम असे एकूण 4 हजार 760 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून चौघांना ताब्यात घेतल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
पोलीस निरीक्षक गणेश कराड हे शासकीय वाहनाने पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरील ठिकाणी दोन पंचांना सोबत घेऊन धाड टाकली असता काही इसम बसस्थानक परिसरात टि सेंटर च्या बाजुला बेकायदेशिर व विनापरवाना आकड्यावर पैस लावुन लोकांकडून पैस घेवून मिलन डे नावाचा मटका जुगार खेळत व खेळवित असताना चौघेजण आढळून आल्याने त्यांना पकडून ठाण्यात आणले.
त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या अंगंझडतीत 4 हजार 760 रोख रकमेसह मटका जुगाराचे साहित्य व नगदी मीलन नावाचा मटका जुगाराचे आकडे लिहीलेले 5 डायरी, त्यावर मराठीत आकडे लिहीलेले, दोन पेन असा मुद्येमाल त्यांच्या ताब्यात मिळुनआल्याने हे सर्व साहित्य आणि रक्कम जप्त करत माहुर शहरातील तीघांसह धनोडा तालुका महागाव जिल्हा यवतमाळ येथील एक अशा चौघांना पोलिस शिपाई पवन राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार कायदा प्रमाणे अटक करण्यात आली आहे.
या कार्यवाहीत पोलीस निरीक्षक गणेश कराड, सपोनि पालसिंग ब्राह्मण सपोनि संदीप अन्येबोईनवाड, पोहेका गजानन चौधरी,पोहेका कैलास जाधव ,पोहेका पुष्पा पुसणाके,पोका पवन राऊत आणि होमगार्ड सहभागी होते.
पुढील तपास पोहेका गजानन चौधरी हे करीत आहेत.