श्रीपुर – प्रभारी पोलस निरिक्षक समाधान सर्जेराव पवार मुळ गांव खेड – भोसे ता . पंढरपूर यांनी वाहतुक विभागात उल्लेखनिय कार्य केल्या बद्दल साकिनाका पोलीस ठाणे मुंबई येथे वाहतुक विभाग प्रशासनाच्या वतीने पोलीस सह आयुक्त यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले होते .
समाधान पवार यांचे सर्व बालपण श्रीपूर येथे गेले . चंद्रशेखर विद्यालयातून माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर पंढरपूर येथिल कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातून उच्च शिक्षण पूर्ण करून त्यांनी स्पर्धा परिक्षेवर आपले लक्ष केंद्रीत केले . दरम्यान त्यांनी काही काळ श्रीपूर येथिल कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखात्यात सुरक्षा अधिकारी म्हणून उत्तम सेवा केली . त्यानंतर स्पर्धा परिक्षेत यश मिळाल्यावर त्यांना सहाय्यक पोलिस निरिक्षक म्हणून काम करणेची संधी मिळाली . हे करत असताना त्यांना वाहतुक विभागात प्रभारी पोलिस निरीक्षक म्हणून बढती मिळाली . ही सेवा बजावत असताना दारू पिऊन वाहन चालवणे या गंभीर समस्ये मध्ये त्यांनी साकीनाका विभागात सर्वात जास्त वाहतुक चालकांवर कारवाई करणेची कामगिरी केल्या बद्दल पोलिस सह आयुक्तांनी उकृष्ठ कामगिरी बद्दल यथोचित सत्कार केला .
आज समाधान पवार आपल्या गावी आले असल्याची माहिती श्रीपूर मधील वर्ग मित्र सचिन नागणे , प्रविण शिन्दे , पांडुरंग हाटकर , रमेश पिसाळ , संतोष यादव , दादा झरकर , सुहास गुडे, ज्ञानेश्वर काटे , संजय ओहाळ , नवनाथ लोखंडे , पोपट पवार , रविंद्र सावंत – पाटील धनाजी तळे , विजय सावंत , रहीम डांगे , सुनिल सुरवसे , यांना समजताच त्यांनी समाधान पवार यांचा यथोचित सत्कार केला . या प्रसंगी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत आपला वर्ग मित्र उच्च पदावर दर्जेदार कामगिरी करत असल्याचा अभिमान असल्याची भावना व्यक्त केली गेली .
यावेळी समाधान पवार यांनी आपले विचार मांडताना दारू पिऊन वाहन चालविल्यास पूर्वी कोर्टा कडून फक्त दंडात्मक कारवाई होत होती . आता कायद्या मध्ये बदल होऊन दारु पिऊन वाहन चालवणे हा गुन्हा ठरवून त्या व्यक्ति वर गुन्हा दाखल होत आहे व्यक्तिगत भविष्यासाठी हा धोका आहे म्हणून सर्वांनी नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे सांगितले .
























