अक्कलकोट – पोलीस पाटील हे पोलीस प्रशासनाचे डोळे, कान असून त्यांनी गावपातळीवर शांतता प्रस्थापित करावे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावर यांनी केले. ते अक्कलकोट येथील दक्षिण पोलीस ठाण्यात आयोजित पोलीस पाटील दीना निमित्त सन्मान कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर पो नी सुरेश चिल्लवार, सपोनि साईनाथ सुरवसे, पोलीस पाटील संघाचे जिल्हा अध्यक्ष शिवानंद फुलारी होते. प्रारंभी सपोनि सुरवसे यांनी प्रस्ताविक केले. सर्व पोलीस पाटील यांनी मागील वर्षभर केलेल्या कार्याची दखल घेऊन प्रमाणपत्र, गुच्छ, फेटा बांधून यथोचित सन्मान करण्यात आला.
डीवायएसपी म्हणाले, प्रत्येक गावात एक हक्कच माणूस पोलीस पाटील असतो. त्यांनी पोलिसांना प्रत्येक घटना, घडामोडी, बारीक, सारिक बाबीचे हितांभूत माहिती वेळच्या वेळी द्यावी. यामुळे पुढील अनर्थ टळला जातो. अनेकांनी मागील वर्षभरातील कोणी पूर भागात, अतिवृष्टी, आशा विविध प्रसंगी उत्तम काम केल्याचे कौतुक केले. पोलीस निरीक्षक चिल्लवार म्हणाले, पुरात, झालेल्या नगरपालिका निवडणूकित वगैरे पोलीस पाटील यांनी चांगले काम केले असून येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूकित सुद्धा अशाच पद्धतीने काम करून सहकार्य करण्याचे आवाहन केले.
यावेळी सपोनि अमोल माने, सपोनि साईनाथ सुरवसे, पोलीस सुनील माने, अजय भैरगुंडे, सिद्धाराम घंटे, अरुण राऊत, हरिदास सलगरे, सुभाष दासरी यांच्यासह हद्दीतील ५० गावचे पोलीस पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन सुनील माने तर आभार बहिरगुंडे यांनी मानले.
यंदाचे ५० वा पोलीस पाटील दिन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशानुसार मागील दोन वर्षांपासून सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात हा उपक्रम राबविले जात आहे. अक्कलकोट दक्षिण, उत्तर, वळसंग, मंदृप, मोहोळ, बार्शी, करमाळा, माळशिरस, सांगोला, पंढरपूर, दक्षिण सोलापूर तालुका, उत्तर तालुका, कुर्डवाडी, माढा, या अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक पोलीस ठाण्यात पोलीस पाटील दिन उत्तहात संपन्न झाला



























