भोकरदन : भोकरदन तालुक्यातील दानापुर येथे दानापुर ते देहेड रोडवर पाटाच्या बाजुला एका पत्राच्या शेडमध्ये जुगार अड्ड्यावर आज ता.०४ गुरुवार रोजी भोकरदन पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली.
दानापुर येथील मोहम्मद युसूफ ईसाक शेख हा जुगार अड्डा चालवत असल्याची गुप्त माहीती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांना माहीती मिळाल्याने तात्काळ पथक तयार करुन सदर ठिकाणी छापा टाकुन मोहम्मद युसूफ ईसाक शेख , मोहम्मद नबी शेख ,आरेफ सादेक मिर्झा , साबेर शेख मोईन , सय्यद आलम सय्यद हुसेन सर्व दानापुर येथील रहिवासी असून यांना जागेवरच पकडुन त्यांचेकडुन 11320/- रुपये नगदी रक्कम व 4,95,000/- रुपये किमतीच्या मोटारसायकल असे एकुण 5,06,320/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलीस कॉन्स्टेबल जावेद शेख यांच्या तक्रारीवरून भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरील कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण बिडवे, पोलीस उपनिरीक्षक राकेश नेटके, पोकॉ संदीप भुतेकर, इंदल बम्हणावत, जावेद शेख यांनी केली आहे.























