तभा फ्लॅश न्यूज/ भोकरदन : पोलीस होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. अनेक तरुण पोलीस भरती जाहीर होण्याची वाट पाहत असतात. दरम्यान,पोलीस दलात सहभागी होणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. ऑक्टोबरमध्ये 10 हजार पोलिसांची भरती करण्यात येणार आहे. पदभरतीच्या मान्यतेसाठी गृह विभागाला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर पोलिस भरती केली जाणार आहे. यानंतर १० हजार पोलिसांची निवड केली जाईल.
अशे परिपत्रक तर बातम्या शोशल मीडिया वर सध्या वायरल होतांना दिसून आले आहे या पार्श्वभूमीवर भोकरदन मधील असलेल्या जालना रोडवरील क्रीडा संकुल मैदानावर तर शहरातील काही खजगी पोलीस अकॅडमी मध्ये गेल्या दोन दिवसांपासून मैदानी सरावासाठी मोठी गर्दी होतांना दिसून आले आहे पोलीस भरतीत सुरवातीचा असणारा भाग म्हणजे मैदानी चाचणी यासाठी मैदानी सराव मजबूत करणे महत्वाचे असते ज्याने एकूण पन्नास पैकी 38-40 च्या दरम्यान गुण मिळवले तो सेफ झोन मध्ये असल्याचे सांगितले जाते या मुळे उन वारा पाणी ची भीती न बाळगता मैदानावर शेकडो तरुण तरुणी अधिक परिश्रम घेत असल्याचे दिसून येत आहे .
सुरुवातीला मैदानी आणि त्यानंतर मुंबई वगळता राज्यभरात एकाचवेळी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या पोलिस भरतीत बँड् समन, चालक शिपाई, पोलिस शिपाई, राज्य राखीव पोलिस बलातील अंमलदार देखील असणार आहेत. उमेदवारांना एका पदासाठी एकाच जिल्ह्यात एकाच अर्ज करता येणार आहे. अर्ज शुल्क १ हजार रुपये असणार आहे. त्यामुळे तुम्ही ज्या जिल्ह्यातून आहात त्याच जिल्ह्यातून अर्ज करता येणार आहे. असल्याच्या बातम्या सध्या वायरलं होतांना दिसून येत आहे
रंजित बेडवाल म्हणाले,
राज्यातील २०२४ आणि डिसेंबर २०२५ पर्यंतच्या पोलिस अंमलदारांच्या रिक्त पदांची माहिती गृह विभागाच्या प्रशिक्षण व खास पथकाच्या अपर पोलिस महासंचालक कार्यालयाने संकलित केली असल्याची प्रथम खबर आहे तर
पावसाळ्यानंतर म्हणजेच ऑक्टोबरमध्ये भरतीला सुरवात होणार संकेत आता दिसून येत आहे. तर पदभरतीच्या मान्यतेसाठी गृह विभागाला प्रस्ताव सादर केला आहे. सुरवातीला मैदानी आणि त्यानंतर मुंबई वगळता राज्यभरात एकाचवेळी लेखी परीक्षा घेतली जाणार असल्याचे बोलले जात आहे