सांगोला – शहरात व तालुक्यामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच आगामी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अनुषंगाने सांगोला पोलिसांकडून रविवार दि.१२ एप्रिल रोजी शहरातील सांगोला पोलीस ठाणे ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक-भीमनगर- वाडेगाव नाका- महादेव गल्ली- शनी गल्ली- परीट गल्ली- हनुमान मंदिर- जय भवानी चौक- साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक- तहसील कार्यालय- परत पोलीस ठाणे या मार्गाने रूटमार्च आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी सांगोला पोलीस निरीक्षक विनोद घुगे, पीएसआय. पाटील, पुजारी, काशीद, महिला पोलीस अधिकारी उबाळे, पोलीस अमलदार व होमगार्ड उपस्थित होते.

























