तभा फ्लॅश न्यूज/परतूर : केंद्र सरकारच्या दूरसंचार व दळणवळण विभागाने हरवलेल्या चोरीस गेलेल्या मोबाईलचा शोध घेणेकामी संचारसाथी पोर्टल सुरू केले आहे. संचारसाथी पोर्टल अंतर्गत CEIR [Central Equipment Identity Register) हरवलेल्या/चोरीस गेलेल्या मोबाईलचा शोध घेणेकामी पोर्टल उपलव्ध आहेत.
सदर पोर्टल पोलीस ठाणे परतुर येथे कार्यान्वित करण्यात आलेले आहे. पोलीस ठाणे हद्दीतील चोरीस गेलेल्या हरवलेल्या मोबाईलच्या नोंद केलेल्या तक्रारी पोलीसांनी पोर्टलवर अपलोड करून तांत्रिक पद्धतीने मोबाईलचा शोध घेऊन नोंद असलेल्या तक्रारी मधुन एकूण 17 मोवाईल किंमती 3,23,000 रुपयांचे एका महिन्यात शोधून काढण्यात पोलीस ठाणे परतुर येथील अधिकारी अंमलदार यांना यश आलेले आहे.
सर्व नागरिकांना पोलीस ठाणे, परतुर तर्फे आवाहन करण्यात येते की, मोबाईलचा चोरी झाला किंवा हरवला तर पोलीस ठाणेस तक्रार नोंद करावी. त्यानंतर स्वतःचे आधार कार्ड व पोलीस ठाणेच्या फिर्यादी प्रतसह CEIR [CentralEquipment Identity Register] या पोर्टलचे कामकाज पाहणारे अंमलदार किरण मोरे व सुनिल पवार यांना भेटून आपली तक्रार पोर्टलवर ऑनलाईन नोंद करावी.