सोलापूर, 26 जुलै (हिं.स.)। सततच्या ताण तणावातील जीवनात पोलीस आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे अनेक आजाराला सामोरे जावे लागते म्हणूनच पोलीसांनी वेळोवळी आपल्या शरीराची आणि आरोग्याची काळजी घेतली पाहिजे असे प्रतिपादन डॉ.सुनिल तावशीकर यांनी केले.
कॉसडेव्हिल फार्मासुटीकल आणि कॉस्मोक्युअर क्लिनिक यांच्या वतीने सोलापूर शहर पोलीस मुख्यालयात पोलीसांसाठी त्वचा, दंतरोग आणि पोटाच्या विकाराची मोफत तपासणी घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी राखीव पोलीस निरीक्षक शरद बारावकर, पोलीस मुख्यालयातील हॉस्पिटलचे डॉ.दिगंबर गायकवाड, कॉसडेव्हिल फार्मासुटीकलचे श्रीकांत सदाफुले यांची प्रमुख उपस्थिती होती.