हदगाव – हदगाव नगर परिषदेच्या २०२५ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच पक्षांनी, अपक्षांनी कसून प्रचार यंत्रणा राबवीत हदगाव शहरात निवडणुकीत एक प्रकारे चांगलीच रंगत आणली होती त्यास मतदारांनी देखील प्रतिसाद देत एकूण ६५.८०% मतदान शांततामय वातावरणात पार पडले असून आता सगळ्यांच्या नजरा मतमोजणी होणाऱ्या दि.२१ डिसेंबर कडे लागलेल्या आहेत.
हदगाव नगरपरिषदेसाठी दि.२ डिसेंबर रोजी झालेल्या मतदानात मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. सायंकाळी उशिरापर्यंत मतदान सुरू होते मतदान केंद्रा भोवताली मतदारांचे रांगाच दिसून येत होते. एकूण ६५.८०% मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावाला असून १० प्रभागासाठी २० नगरसेवक तर १ नगराध्यक्ष निवडून देण्यासाठी मतदारांनी मतदान करून उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीन मध्ये बंद केले असून मतमोजणी दि.२१ डिसेंबर रोजी होणार असून मतदारांना २१ डिसेंबरची प्रतीक्षा करावी लागणार आहे. मतदारांमध्ये निकालाविषयी प्रचंड उत्सुकता वाढली असल्याचे दिसून येत आहे.
शहरातील २३,१९४ मतदारांपैकी १५,२६१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यात पुरुषांनी ७८९० तर स्त्रियांनी ७३७१ याप्रमाणे आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

























