तभा फ्लॅश न्यूज/उमरी : सद्यस्थितीत अभेद्य अशी राजकीय पार्श्वभूमी असतानाही सत्तेपेक्षा सेवेला एक आई समान प्राधान्य देणाऱ्या, अभियंत्याची अफलातून दूरदृष्टी असलेल्या, तेवढ्याच संवेदनशील हृदयाच्या व समाजसेवाच आपला जीवन धर्म मानत त्या आपल्या कार्याद्वारे सत्यात उतरणाऱ्या आमदार राजेश पवार यांच्या सुविद्य पत्नी, माजी जिल्हा परिषद सदस्या, तथा नांदेड दक्षिणच्या महिला आघाडीच्या भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा अध्यक्षा सौ.पुनमताई पवार यांना नुकताच सातासमुद्रापार लंडन येथे लोकमत महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमास लोकमत समूहातील उच्चस्तरीय अधिकारी, सुप्रसिध्द सिने अभिनेता सुनील शेट्टी, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत सदरील पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
जिल्हा परिषदेची पहिली निवडणूक लढवताना त्या महाराष्ट्र राज्यातून दुसऱ्या क्रमांकाच्या विक्रमी मताधिक्याने विजयी होत विरोधकांच्या उरात कायमची धडकी भरवली! एक आमदार दोन कामदार ही भूमिका आपल्या पतीसोबत खांद्याला खांदा लावून निभावत त्यांनी अनेक समाज उपयोगी उपक्रम आपल्या जिल्हा परिषद सर्कल तथा नायगाव विधानसभा मतदारसंघात राबवले.
त्यांच्या दूरदृष्टी संकल्पनेतून नायगाव विधानसभा मतदारसंघात तब्बल ५० हजारांच्या वर लोकांच्या डोळ्यांची तपासणी करून मोफत चष्मे वाटप करण्यात आले. ओवाळीते भाऊराया या कार्यक्रमाद्वारे आपल्या मतदार संघातील सगळ्या भावांना १५ हजार राख्या पाठवून त्यांनी एक विश्वविक्रमच केला. विद्यार्थ्यांसाठी त्या प्रेरणास्पद आईप्रमाणे सुरक्षा कवच ठरल्या असून आपल्या मतदारसंघात तब्बल ७५ हजारांच्या वर छत्र्याचे वाटप त्यांनी करीत हा पण एक विश्वविक्रम केला.
आज घडीला नायगाव विधानसभा मतदारसंघातील तीनही तालुक्यातील प्रत्येक गावात पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे फक्त त्यांच्याच छत्र्या सर्व रस्त्यावर दिसत आहेत.
नवजात प्रसुती मातांसाठी हजारो किटचे वाटप त्यांनी करत माता व बालसंगोपनाला आपल्या मतदारसंघात अनन्यसाधारण महत्त्व दिले.
स्वतः इंजिनीयरची पदवी घेतलेल्या सौ.पुनमताई पवार यांची राजकीय दूरदृष्टी पण तेवढीच महत्त्वाची ठरते!
त्यांच्या उपरोक्त सर्व उपक्रमाने आमदार राजेश पवार यांच्या विजयात त्यांचा सिंहाचा वाटा ठरलेला आहे. त्यांच्या स्तुत्य उपक्रमाची यशोगाथा नायगाव मतदारसंघातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात पसरली असल्यामुळे लोकमत समूहाने या गोष्टीची आवर्जून दखल घेत सौ.पुनमताई राजेश पवार यांना लोकमत महाराष्ट्र रत्न पुरस्काराने गौरवीत केले.
त्यांना हा पुरस्कार मिळाल्यामुळे अख्ख्या नायगाव विधानसभा मतदारसंघात त्यांच्या चाहत्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून त्यांच्यावर कौतुकांचा व अभिनंदननाचा पाऊसच पडत आहे.
राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...