धाराशिव – दोन वर्षापूर्वी स्वच्छता नगर पंचायत कडे डस्टबिन आलेल्या आहेत त्या सभागृहामध्ये धूळ खात पडल्या आहेत. मागे पण निवेदन दिले परंतु वाटप करण्यात आले नाही.
प्रत्येक कामात लोकप्रतिनिधींकडून त्या कामाचे श्रेय कसे मिळेल याचाच विचार केला जात आहे. नागरिकांच्या हिताचा विचार अजिबात करण्यात येत नाही. अनेक कामे प्रलंबित आहेत नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून नागरिकांच्या हिताची प्रत्येक कामाचा पाठपुरावा करून कामे पूर्ण करुन घेण्यात येतील. डस्ट वाटप करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ता. अध्यक्ष अक्षय चेडे श्रीमंत बापू दशरत कवडे, शंभू गायकवाड यांनी ११ डिसेंबर रोजी दिले.


























