पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव ( जरगवस्ती) पोपट राजाराम जाधव वय 33 वर्ष याने दारूच्या नशेत आपल्या राहत्या घरातील पञ्याच्या लोखंडी ॲगलला दोरीच्या साहहयाने गळफास घेऊन बुधवारी राञी आत्महत्या केली.माञ घरात कोणीच नसल्यामुळे ह्या घटनेचा उलगडा गुरूवारी सकाळी झाला.यानंतर मयत पोपट याचे भाऊ सागर पोपट जाधव वय 31 याने सदरच्या घटनेची माहीती पिलीव पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलीस हवालदार धनाजी झगडे व स्वरूप शिंदे व पोलीस नाईक अमीत जाधव यांनी सदरच्या घटनेचा घटनास्थळी जाऊन रितसर पंचनामा केला.व सदरचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी माळशिरस येथे पाठविण्यात आला शवविच्छेदन करून तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.या घटनेची खबर सागर पोपट जाधव यांनी दिली असुन त्यानुसार मयत नं 42/2025 बीएसएनएस नुसार 194 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार धनाजी झगडे हे करीत आहेत. चौकट _ याबाबत या घटनेबाबत पिलीव परीसरात दिवसभर अशी चर्चा सुरू होती की मयत पोपट ह्याची पत्नी पाच _ सहा दिवसांपुर्वी कोणालाही काहीच न सांगता निघुन गेली होती .तिचा सर्व नातेवाईकाडे शोध घेऊनही तपास लागला नाही .मयताला चार वर्षांची एक मुलगी तर अवघ्या सहा महिन्याचा मुलगा आहे.या मुलांचा आता पत्नी निघुन गेल्यामुळे सांभाळ कोण करणार याच्या टेन्शन मध्येच त्याने हे शेवटचे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे.आता त्या दोन निरागस बालकांचा सांभाळ कोण करणार आता वडील ह्यात नाहीत आणी काळीज नसणारी निडर आई आपल्या चिमुकलयांना सोडुन निघुन गेली .मयत पोपट याचे आई _ वडील पण हयात नाहीत मग या मुलांचा सांभाळ आता कोण करणार अशी चर्चा पिलीव परीसरात सुरू आहे. फोटो _ मयत. पोपट जाधव.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...



















