पुणे अपघातप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक केली आहे. अजय तावरे आणि श्रीहरी हरलोर, अशी अटक करण्यात आलेल्या डॉक्टरांची नावे आहेत. त्यांच्यावर अल्पवयीन मुलाच्या ब्लड सॅम्पलची अदलाबदल केल्याचा आरोप आहे. याच आरोपाखाली पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.
पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत त्याचे ब्लड सॅम्पल तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवले. मात्र, हा धनिकपूत्र कायद्याच्या तावडीतून सहीसलामत सुटावा, यासाठी ससूनमधील दोन वरिष्ठ डॉक्टरांनी त्याच्या ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार केली.