मोडनिंब – येथे ग्रामपंचायत समोर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दोन्ही महापुरुषांच्या पुतळ्यांबाबत अखेर ग्रामस्थ व प्रशासन यांच्यात सकारात्मक तोडगा निघाला आहे. प्रशासनाच्या विनंतीला मान देत ग्रामस्थांनी स्वखुशीने सन्मानपूर्वक हे पुतळे काढण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला.
सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंब (ता.माढा) शहरात गुरवार दि. ०९ रोजी माढ्याचे तहसीलदार संजय भोसले यांच्या अध्यक्षखाली पुतळ्या संदर्भात जिल्हाधिकारी सोलापूर एस. कार्तिकेयन यांच्या आदेशावरून शांतता कमिटीची बैटक घेण्यात आली, यावेळी टेंभूर्णी पोलीस ठाण्याचे प्रभारी राहुल आत्राम, गट विकास अधिकारी महेश सुळ, पोलीस निरीक्षक महेश ढवन, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत मदने, ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर कांबळे यावेळी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आज संध्याकाळ पर्यंत काढण्याचे अवाहन प्रशासनाने केले. त्या अवाहन सहमती दर्शवत ग्रामस्थांनी आज संध्याकाळ पर्यंत दोन्ही पुतळे आम्ही स्वतः हून काढून घेण्याचे आश्वासन दिले. यावेळी दोन्ही पुतळे संदर्भातील अधिकृत मान्यता मिळणे बाबत प्रशासकीय स्थरावर सहकार्य मिळावे अशी अशा ग्रामस्थांनी व्यक्त केली.
जिल्ह्यात मोडनिंब, चिखलठाण, पुनवर, अंकोली, मोहोळ, परिते, भेंड, अंजनगाव, भोसे, चव्हाणवाडी येथे रातोरात पुतळे उभारले गेले आहेत. अंजनगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणी नंतर गावात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता.
———————————————————————–
मोडनिंब शहरातील ग्रामस्थांनी आज संध्याकाळ पर्यंत दोन्ही पुतळे स्वतः हून सन्मानपूर्वक काढून घेण्याचे आश्वासन दिले. या निर्णयाचे पोलीस प्रसासनाकडून स्वागत करतो. या प्रमाणेच इतर गावांनीही विनंती करतो कि, मोडनिंब शहराचे अनुकरण करावे व आदर्श घ्यावे.
– राहुल आत्राम, टेंभूर्णी पोलीस ठाण्याचे प्रभारी
———————————————————————–
मोडनिंब येथे जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या आदेशावरून शांतता कमिटीची बैटक घेण्यात आली, मोडनिंब ग्रामस्थांनी स्वखुशीने पुतळे काढण्याचा इतिहासिक निर्णय घेण्यात आला.या प्रमाणेच इतर गावांनीही आदर्श घ्यावा.
– संजय भोसले, तहसीलदार माढा

























