सोलापूर – सध्या जोरदार चर्चेत असलेल्या ‘लास्ट स्टॉप खांदा…’ या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन करणारा हा चित्रपट २१ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार असून,चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे.
शिवम फिल्म क्रिएशन सिग्नेचर ट्यून्स,स्नेहा प्रॉडक्शन्स यांनी “लास्ट स्टॉप खांदा… ” प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सचिन कदम आणि सचिन जाधव यांनी या चित्रपटाती प्रस्तुती केली आहे.प्रदीप मनोहर जाधव हे या चित्रपटाचे निर्माते असून सचिन कदम, अमृता सचिन जाधव सहनिर्माते आहेत. श्रमेश बेटकर लिखित या चित्रपटाचं दिग्दर्शन विनित परुळेकरनी केलं आहे.
चित्रपटात अभिनेता श्रमेश बेटकर अभिनेत्री जुईली टेमकर, निखिल बने,मंदार मांडवकर,शशिकांत केरकर,सुदेश जाधव,महेश कापरेकर, प्रियांका हांडे,डॉ.सचिन वामनराव,गणेश गुरव,निशांत जाधव,गिरीश तेंडुलकर,जयश्री गोविंद अशी तगडी स्टारकास्ट आहे.तर पाहुणे कलाकार म्हणून प्रभाकर मोरे,धनश्री काडगावकर,अशोक ढगे हे आपल्या भेटीस येणार आहेत. चित्रपटाचं छायांकन हरेश सावंत यांचं असून कलादिग्दर्शक केशव ठाकुर आहेत.




















